Sunday, 2 December 2012

चित्रपट आणि संगीत 
           हल्ली चे चित्रपट म्हणजे एक विनोदच होऊन बसलाय . काय ती ,गाणी काय ती अक्टिंग आणि काय ते कलाकार . आता हेच उदाहरण घ्या ना ; नुकताच प्रदर्शनाच्या वाटेवर असलेला अक्षय कुमार चा चित्रपट खिलाडी ७८६. बापरे काय गाणी आहेत त्यातली. गाणी आहेत कि शब्दांची जुळवा जुळाव हेच कळात नाही .काय म्हणे तर "तेरे अखीयोन का वार हुक्का बार" . अर्था अर्थी कशाचा काही सबंध लागत नाही . कमालच म्हणायची आज काल च्या गीतकारांची . मोजून ४ ते ५ पंक्ती लिहिल्या जातात आणि त्यातही शब्दांची जुळवाजुळव . मग आपले   संगीतकार त्यात खुपसारा स्वरांचा मसाला ,ठुमके टाकतात . आणि अशाप्रकारे ती गाण्याची भेळ प्रेक्षकांनच्या कानी भरवण्यासाठी सज्ज होते . ह्या असल्या गाण्यांना गणपती उत्सवात पार ऊत येतो. बिचारा गणराज वैतागला नाही तर नवलच म्हणायच .

           ह्या चित्रपटांच्या नायकाचा नेहमीच चांगलं होत . बर्याचदा चित्रपटाची नायिका ही श्रीमंत घराण्यातली असते आणि नायक हा बिचारा गरीब असतो . आणि मग तो त्या नायिकेला कसा पटवतो ह्याचा स्वप्नावत प्रवास चालु होतो . आता फार लांब कशाला जायच ,अगदी आत्ताचा चित्रपट घ्या ना, जब तक हैं जान . ह्या चित्रपटात आपला नायक शाहरुख खान,ह्याच काय शिक्षण आहे हे शेवट पर्यंत कळत नाही, परंतू  एका गोष्टीचा उलगडा होतो की, हा व्यक्ती पैसे कमावण्यासाठी परदेशात जातो . तिथे तो गीटार वाजवून पैसे कमावतो म्हणजे थोडक्यात भीक मागतो . परदेशात जाऊन भीक मागण्या पेक्षा जर भारतात राहून लोहारी सुपारी केली असती तर काय झाला असता ? असो , तर हा आपला नायक एके दिवशी गाण गात असताना ,म्हणजेच भीक मागत असताना ,आपली नायिका कैतरिना कैफ तिथे येते आणि त्याला भीक देते . तिला त्याचा गाणं आवडता आणी मग गाणं शिक्याचा निमित्ताने ते एकत्र येतात आणि त्यांचा प्रेम जमत . किती सहज शक्य होता ना त्याचसाठी . ती गर्भ श्रीमंत नायिका आणि हा रस्त्यावरचा भिकारी . बर त्यावरूनही हद्द म्हणजे नंतर हे साहेब बॉम्बनाशक पथकात निष्णात बॉम्ब नाशक बनतात हे वेगळाच काहीतरी . म्हणजे यावर प्रेक्षकाने हसायचा की रडायचा अजिबात नाही  कळत . हे असे चित्रपट चालतातच कसे ह्याच नवलच वाटत.

          चांगले हिंदी चित्रपट आणि चित्रपट संगीत ऐकायला मिळणे फारच दुर्मिळ झालय हल्ली . गायक किंवा गायिकेला वाटता कि कसाही उगाच वेडा  वाकडा आवाज काढला किंवा आरडाओरड केली म्हणजे खुप मस्त गाणं गायले. त्या RockStar चित्रपटामध्ये मोहित चौहान बेंबी चा देठा पासून ओरडतो आणि त्याला खूप सारे अवार्ड्स मिळतात . ह्या साहेबांना संगीतातला स तरी काळेन तर शप्पथ . भारतीय संगीत फार कमी लोकांनी जपलय आणि आत्मसाथ केलय.

         असो ह्या विषयी जेवढा बोलवा तितका कमीच आहे ;कारण हे माझा वैयक्तिक मत आहे. ह्या मूर्ख लोकांना मोठा करणारे शेवटी प्रेक्षक वर्गाच असतात हे विसरता कामा नये. प्रेक्षकांनी विचार करायला हवा की  काय योग्य आहे आणि काय अयोग्य . कोणाला दात द्यावी आणि कोणाकडे पाठ फिरवावी , हा सर्वस्वी प्रेक्षकाचा निर्णय आहे.